रीपाई चा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा

0 148

अहमदनगर –   राज्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (Maharashtra State Transport Corporation) कर्मचाऱ्यांना (employees) त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. अनेक ठिकाणी एस. टी. कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणास वैतागून स्वतःचे जीवन संपवले आहे. राज्य सरकार मात्र एस. टी. कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असून त्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही. (RPI supports Maharashtra State Transport Corporation employees’ agitation)

सत्तेत बसलेल्या शासनकर्त्यांनी कामगारांच्या प्रश्नापासून पळ काढला आहे. एस. टी. च्या आगारात सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास दडपण्यासाठी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहे. त्यांना कामावरून निलंबित करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणाबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अहमदनगर जिल्हा तीव्र निषेध करत असून एस. टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती अमित काळे युवक जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांनी दिली आहे.

हे पण पहा –  जिल्हा रुग्णालयात भीषण आग, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत – राजेश टोपे

Related Posts
1 of 1,517
लवकरात लवकर एस. टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केले नाहीतर कुठल्याही क्षणी रीपाई स्टाईल तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी प्रशासनाला दिला आहे. (RPI supports Maharashtra State Transport Corporation employees’ agitation)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: