RPI मागासवर्गीयां पुरते मर्यादीत नसून, पक्षात सर्व समाज घटक समावलेले -अमित काळे

0 96

अहमदनगर –  आरपीआय (RPI ) फक्त मागासवर्गीय समाजापुरते मर्यादीत नसून, सर्व समाज घटक या पक्षात समावलेले आहे. राजकारणात आरपीआयचे स्वतंत्र असतित्व व एक राजकीय शक्ती आहे. भविष्यात युती असली तर युतीसह अन्यथा आरपीआय स्वतंत्र ताकतीने निवडणुकांना सामोरे जाणार आहे. आरपीआयमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काम करण्याची मोठी संधी आहे. आजचे कार्यकर्ते उद्याचे नेते व लोकप्रतिनिधी म्हणून उदयास येणार असल्याची भावना आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे (Amit Kale) यांनी व्यक्त केली.

नागरदेवळे (ता. नगर) येथील युवकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षात आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष काळे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आरपीआय आय.टी. सेल जिल्हा संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, पँथर ग्रुपचे अध्यक्ष आकाश जाधव, भिंगार अर्बन बँकेचे संचालक एकनाथ जाधव, नागरदेवळे ग्रामपंचायत सदस्य मयूर पाखरे, आकाश बडेकर, दया गजभिये, आशिष भिंगारदिवे, महादेव भिंगारदिवे, प्रविण वाघमारे, निखिल सुर्यवंशी, नितिन निकाळजे, गौतम कांबळे, विक्रम चव्हाण, विशाल कदम, अक्षय गायकवाड, मिथुन दामले, बापू भोसले, धनंजय पाखरे, बाबासाहेब बनसोडे, कुणाल घाटविसावे, शाहुल साळवे, कृष्णा धावडे, प्रकाश धावडे, करण थोरात आदी उपस्थित होते.

हे पण पहा –  Pimpri Chinchwad | दुकान मालकावर कोयत्याने सपासप वार

पुढे बोलताना काळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली कार्य करीत आहे. सर्व समाज घटकांना पक्षात समान संधी देण्यात आली आहे. सत्तेत वाटा म्हणून भाजप बरोबर आरपीआयची युती आहे. मात्र आरपीआय आपले विचार व ध्येय-धोरणाने राजकारण करीत आहे. एक झेंडा, एक पक्ष व एक नेता या ध्येयाने प्रेरित होऊन सर्व कार्यकर्ते कार्य करीत असून, युवकांनी पक्ष बळकटीकरणासाठी कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.

Related Posts
1 of 1,635

प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन अजय पाखरे, दिलिप टेमकर, मंगल पाखरे, मंगल जाधव यांच्यासह युवा कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी तुषार धावडे यांची आरपीआय सोशल मिडीया आय.टी. सेल नगर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच पक्षात प्रवेश केलेल्या युवकांवर पक्षाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले. पँथर ग्रुपचे अध्यक्ष आकाश जाधव, भिंगार अर्बन बँकेचे संचालक एकनाथ जाधव व नागरदेवळे ग्रामपंचायत सदस्य मयूर पाखरे यांनी पक्षात प्रवेश केलेल्या युवकांचे पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

श्रीगोंद्यात २५ हजाराचा गुटखा पकडला …, गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: