
Rohit Pawar : बारामती येथील ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल आमदार रोहित पवार अडचणीत
बारामती ः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार Rohit Pawar सध्या चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत. त्यांच्या बारामती येथील ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
बारामती अग्रो साखर कारखान्यांबाबत सरकारने गाळप हंगाम सुरू करण्याबाबत तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु रोहित पवार Rohit Pawar यांच्या साखर कारखान्याने तारखे आधीच गाळप हंगाम सुरू केल्याने कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जुनी पेन्शनसाठी भरलेल्या शाळा सोडल्या… A few schools were filled in a row in the city.
मंत्री समितीच्या निर्णयाचे उल्लंघन करून गाळप केल्याने बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बारामती ॲग्रोचे सर्वेसर्वा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
इन्फ्लूएंझा या विषाणूची नगर जिल्ह्यात एन्ट्री, 23 वर्षीय तरुणांचा इन्फ्लूएंझा (H3N2) ने मृत्यू
या प्रकरणावरून भाजपाच्या नेत्यांनी पवार यांच्यावर टीकाही केली होती. त्या टीकेला पवार यांनी जोरदार उत्तर दिले होते. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर पवार काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.