
कर्जत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी ४५ उमेदवारी अर्ज राहिले आहे. काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत.
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील कर्जत तालुका सहकार व शेतकरी विकास आघाडी पॅनल विरुद्ध आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्या नेतृत्वाखालील कर्जत तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलमध्ये चुरस होत आहे. या निवडणुकीत शेतकरी संघटना उतरल्याने चुरस वाढली आहे.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत -निवडणुकीची रणधुमाळी
शेतकरी संघटनेेने काही जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजपसह मित्रपक्षांना घेऊन तिसरी आघाडी स्थापन करीत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे ठासून सांगणारे जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांची तलवार म्यान झाली आहे. त्यांनी भाजप, पर्यायाने आमदार राम शिंदे यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे.
ही लढत आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्या गटातच होणार आहे. त्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.