
अहमदनगर – कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात सध्या राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरु झालेले आहे. या इनकमिंगमुळे या मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद वाढत चाल्याने भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
कर्जत-जामखेड मध्ये विकास कामे मोठी होत आहे. ही सर्व किमया आमदार रोहित पवार यांनी करून दाखविली आहे. विकास कामे करून त्यांनी जनतेची मने कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात जिंकली आहेत. या विकास कामांमुळे आता विरोधकही राष्ट्रवादीत दाखल होण्यास सुरवात झाली आहे.
विखे गटाचे कट्टर समर्थक जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व मार्केट कमिटीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांचा समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जामखेड पाठोपाठ कर्जतमधीलही काहीजण राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.
भाजपातील त्या नेत्याचा कट्टर समर्थक ही आता राष्ट्रवादीत दाखल होणार असून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी करणार असल्याची चर्चा सध्या कार्यकर्त्यां सुरु आहे. त्यामुळे नेतेही अस्वस्थ झालेले आहेत. परंतु या सर्व घडामोडीत राष्ट्रवादी आपली ताकद वाढवून घेत आहे.