रोहित पवारांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट, रस्त्यांची कामे लागणार मार्गी

0 193

नवी दिल्ली  –  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)  यांची आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मंगळवारी (ता. १४) भेट घेऊन कोरोना महामारी काळात १३ हजार कि.मी. चे रस्ते निर्माणाचे कार्य करून नवा विक्रम केल्याबद्दल अभिनंदन केले. मतदारसंघातून जाणारा पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गाचे खर्डा ते कुर्डूवाडी यादरम्यान रखडलेले ११४ कि. मी चे काम जलदगतीने सुरु करणे आवश्यक आहे. संत एकनाथ महाराज, संत भगवान बाबा, संत गीतेबाबा, संत गोरोबा कुंभार यांसारख्या प्रख्यात संतांच्या पालख्या आणि लाखो यात्रेकरूंसह अनेक दिंड्या या मार्गाने पंढरपूरला जात असतात. खर्डा गावापर्यंतच्या मार्गाचे काम आधीच प्रगतीपथावर आहे, मात्र खर्डा ते कुर्डुवाडी पर्यंतचा पुढील भाग अद्याप प्रलंबित आहे. त्यासाठी पुरेसा निधी देण्याची मागणी यावेळी आमदार रोहित पवार यांनी गडकरी यांच्याकडे केली.

सोबतच मतदारसंघातील श्रीगोंदा आणि जामखेड येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ ड याचे पुनर्निर्माण आणि नुतनीकरण करण्यासंदर्भात आणि अहमदनगर- सोलापूर यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ५१६ अ या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली होती. करमाळा मतदारसंघातील जातेगाव ते टेंभुर्णी हा रस्ता NHAI कडे हस्तांतरित करण्यासाठी आ. संजय मामा शिंदे यासाठी प्रयत्न करत असून करमाळ्याच्या वतीने आमदार रोहित यांनीही पाठपुरावा केला आहे. याबाबत शरद पवार साहेब आणि अजितदादा पवार यांनीही यासाठी नितीन गडकरी साहेब यांच्याशी चर्चा करून काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले होते. कामाला मंजुरी मिळाली असून या रस्त्यांच्या कामाच्या निविदा पूर्ण झाल्या आहेत. यासाठी नितीन गडकरी साहेब यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी वेळ देण्याची विनंती आमदार रोहित पवार यांनी यावेळी केली.

हे पण पहा –  Pimpri Chinchwad | दुकान मालकावर कोयत्याने सपासप वार

Related Posts
1 of 1,635

केंद्रीय रस्ते निधी (CRF) अंतर्गत काही निधी मतदारसंघासाठी मिळावा यासाठी आ. रोहित पवार यांनी नितीन गडकरी साहेबांशी चर्चा केली. अहमदनगर ते जामखेड, बीड आणि दुर्गम भागातील गावे, जिल्ह्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ५६१ चे ५१ किमी अंतराचे काम मागील वर्षी पूर्ण झाले आहे. मात्र साबळखेड – आष्टी – चिंचपूर – जामखेड येथून २० किलोमीटरचा पॅच गेल्या ६ वर्षांपासून रखडला आहे. मुसळधार पावसामुळे या मार्गाची अधिकच दुरवस्था झाली आहे. ज्यावर वाहने चालवणे अशक्य आहे. हा रस्ता मराठवाडा व अहमदनगरला जोडणारा अत्यंत महत्वाचा आहे. रस्त्यांच्या या कामासाठी पुरेसा निधी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी नितीन गडकरी साहेब यांनी दिल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

धक्कादायक ! रुग्णाने केला रुग्णाचा खून ,शासकीय रुग्णालयातील घटना

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: