अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एकाची लूटमार..

0 257

अहमदनगर –   अश्लील व्हिडीओ (Pornographic videos)  व्हायरल (Viral) करण्याची धमकी देत घेत अहमदनगर (Ahmednagar) शहरातील केडगाव परिसरातील बहीण-भावाने (Siblings)  पनवेल (Panvel) येथील एका व्यक्तीची लूटमार केली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी दि. २७ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Robbery of a man threatening to make a pornographic video viral.)

याप्रकरणी पीडित व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून पूजा कचरे व विक्रम कचरे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. व्हि दोघे, केडगाव) यांच्याविरोधात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर २०२१ दरम्यान ही घटना घडली. पूजा कचरे हिने तिच्या भावाच्या मदतीने फिर्यादीकडून पाच लाख रुपये  घेतले होते. या व्यक्तीने हे पैसे परत मागितले, तेव्हा आरोपींनी फिर्यादी व त्याच्या वाहनचालकास मारहाण केली.

‘आम्ही दोघांनी लग्न केले नाही’ सलमान खान ने केला मोठा खुलासा

Related Posts
1 of 1,603

यावेळी फिर्यादीच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची चेन व एटीएम कार्ड हिसकावून घेतले. तसेच आणखी पाच लाख रुपये दिले नाहीत, तर फिर्यादीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी सहायक निरीक्षक नितीन रणदिवे हे पुढील तपास करत आहेत.(Robbery of a man threatening to make a pornographic video viral.)

हे पण पहा  – Hasan Mushrif | हसन मुश्रीफ पत्रकार परिषद

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: