DNA मराठी

ahmednagar crime: लुटणारी टोळी पकडली…

शस्त्रांचा धाक दाखवून ट्रक चालकास लुटणारी टोळी शस्त्र व मुद्देमालसह एक तासात जेरबंद करण्यात नगर तालुका पोलिसांना यश

0 6

अहमदनगर : रात्रीच्यावेळी शस्त्रांचा धाक दाखवून ट्रक चालकास लुटणारी टोळी शस्त्र व मुद्देमालसह एक तासात जेरबंद करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले.

अपेक्षा कमी ठेवल्यास विवाह लवकर जमतील….

साई प्रदीप ठोसर (वय 19, रा. अमित नगर, केडगाव), शिवप्रसाद नारायण शिंदे (वय 22 रा. एकता कॉलनी, नगर) यांना ताब्यात घेण्यात आले. तर अक्षय साबळे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. रामवाडी) हा पसार झाला आहे.

Related Posts
1 of 2,492

वाळुंज बायपास ते आरणगाव बायपास दरम्यान 6 मे रोजी रात्री उशिरा ट्रक चालकाला लुटले होते. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांचे रात्रगस्त करणारे पथक घटनास्थळी पोहोचले. तीन आरोपींपैकी दोन आरोपींना तेथे जमा झालेल्या ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी लुटमार करताना जागीच पकडले. एकजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. त्यांच्याकडून दोन मोबाईल, एक लोखंडी कत्ती, अठराशे रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: