दुकानदाराला दौंड जवळ लुटले; कोयत्याचा धाक दाखवत 2 लाख 50 हजार पळवले..!

0 240
Robbed the shopkeeper near Daund; 2 lakh 50 thousand were stolen out of fear of being killed ..!

 

श्रीगोंदा  :-  तालुक्यातील काष्टीत व्यवसाय करणाऱ्या दुकानदाराला दौंड – काष्टी रोडवर भीमा नदीच्या पुलावर सोनवडी हद्दीत दुचाकीवरून पाठलाग करत दोन अज्ञातांनी गाडी अडवून डोळ्यात मिरची पुड टाकली. आणि कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 50 हजार 600 रुपये लुटून पसार झाले. सदरील घटना शुक्रवारी रात्री 7.00 वाजण्याच्या सुमारास हॉटेल धनश्री जवळ घडली.

 

याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, दौंड येथील कांतीलाल घनजी पारसिया (वय 46, रा.कस्तानचाळ, दौंड ) यांचे दौंड – पाटस रोडवर “पटेल एजन्सी” नावाचे हार्डवेअर मटेरियलचे दुकान आहे.  श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे असलेल्या दुकानाचे ते व्यवस्थापक आहेत. दौड ते काष्टी असे रोज येवून जावून ते हे कामकाज पाहतात. शुक्रवारी दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी नेहमीप्रमाणे ते काष्टी येथील हार्डवेअर दुकान मधील जमा रक्कम 2 लाख 30 हजार 600 रूपये घेवून, मुलासोबत मोटार सायकलवरून दौंडला निघाले होते. भिमा नदीच्या पुलाजवळ सोनवडी गावचे हद्दीतील धनश्री बिअर बारच्या समोर आल्यावर त्याच्या पाठीमागून मोटार सायकलवर दोन व्यक्ती आल्या.

 

 

Related Posts
1 of 2,326

त्यांच्या मोटार सायकलला ओव्हरटेक करीत पाठीमागे बसलेल्या एका चोरट्याने मिरची पुड त्यांच्या तोंडावर फेकली. मात्र दोघेही खाली वाकल्याने त्यांच्या डोळयात मिरची पुड गेली नाही. चोरटे असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी गाडीचा वेग वाढवला..! मात्र, काही अंतरावर रोडच्या बाजुला दोन व्यक्ती थांबलेल्या होत्या. त्यांनी त्यांच्या गाडीला त्यांची मोटार सायकल आडवी लावून, कोयत्याचा धाक दाखवत पैशाची बॅग व 20 हजार किंमतीचा मोबाईल असा एकूण 2 लाख 50 हजार 600 रूपयांचा ऐवज चोरला आहे.  चारही चोरटे अंदाजे 20 ते 25 वयोगटातील आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: