रितेश देशमुख म्हणतो टिक टॉक बंद झाल्यानंतर मी बेरोजगार झालो होतो

0 82

 नवी मुंबई –   बॉलीवूड (Bollywood) अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)  हा आपल्या पत्नी जिनिलिया देशुमुख (Genelia Deshumukh)  बरोबर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट करत असतो. या कारणाने तो सोशल मीडियावर चर्चेत देखील असतो. नुकताच त्याने टिक टॉक (Tik tok) बद्दल एक प्रतिकिया दिली आहे. या प्रतिक्रियेमुळे ते परत एकदा सोशल मीडियावर चर्चचा विषय बनला आहे. (Riteish Deshmukh says I was unemployed after Tick Talk closed)

त्याने दिलेल्या एका मुलाखतीत टिक टॉक बंद झाल्यानंतर तो बेरोजगार (unemployed ) झाला होता. परंतु, इन्स्टाग्राम (Instagram) वरील रील्स (Reels) फीचर इंट्रोज्युझ झाल्यापासून त्याला पुन्हा काम मिळालं.अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मुलाखतीत रितेश म्हणाला, लॉकडाउन दरम्यान, सगळेच कठीण प्रसंगातून गेले. अशात आम्ही सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा विचार केला. म्हणून आम्ही टिक टॉक व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. परंतु, भारतात टिक टॉक बंद करण्यात आलं आणि असं वाटलं मी बेरोजगार झालो. असं वाटायचं की देवा आता काय करू मी. जे काम मी करायचो ते तर गेलं.

हे पण पहा –  ‘नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय’ | विखे म्हणतात, ‘रुको जरा सबर करो!’

Related Posts
1 of 84

रितेश पुढे म्हणाला, “काही दिवसांनंतर इन्स्टाग्रामवर रिल्स आले. मी म्हणालो चल रिल्स तयार करू.” त्याने गेल्या वर्षी लॉकडाउन दरम्यान, रितेशने टिक टॉक या अॅपवर पदार्पण केले होते. रितेशसोबत त्याची पत्नी जिनिलिया देशुमुख देखील त्या व्हिडीओमध्ये असायची. त्यांचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल व्हायचे. (Riteish Deshmukh says I was unemployed after Tick Talk closed)

क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरण, एनसीबी शाहरुखच्या ‘मन्नत’वर दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: