श्रीगोंदा तहसील समोर ‘नो पार्किंग’मध्ये वाहनांना हक्काची जागा

0 11

श्रीगोंदा ;-  श्रीगोंदा तहसीलदार कार्यालयाच्या समोर मोठ्या दिमाखात नो पार्किंग चा फलक मोठ्या दिमाखात झळकत आहे मात्र अगदी फलकावर सोडून फलकाच्या आजूबाजूला तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी वाहने लावताना दिसत आहेत त्यामुळे श्रीगोंदा तहसील समोर ‘नो पार्किंग’मध्ये वाहनांना हक्काची जागा वाटते कि काय ? असा प्रश्न सर्व सामान्य नागरीकातून विचारला जात आहे मात्र तहसीलदार याबाबत अद्न्यभिज्ञ आहेत असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही .

वाहनतळ उपलब्ध नसलेल्या ठिकाणी ‘नो पार्किंग’ (ना वाहनतळ) क्षेत्रात वाहने उभी करण्यामुळे होणारे वादाचे प्रसंग टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तसेच श्रीगोंदा तहसीलदार कार्यालयाने कार्यालयाच्या समोर ‘नो पार्किंग’झोन निर्माण केला . रहदारीस अडथळा आणि इतर निकष पडताळून वाहतूक पोलीस रहिवाशांना, व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांना रस्त्याकडेला वाहने उभी करण्याची परवानगी दिली आहे कि काय असा  प्रश्न निर्माण झाला आहे .गेल्या काही दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांनी अवैध पार्किंगविरोधात विशेष मोहीम हाती घेतली होती. प्रतिबंध असलेल्या भागात, रस्त्याकडेला उभी वाहने चाप लावून जागच्या जागी खिळवून ठेवत होते. या कारवाईविरोधात काही ठिकाणी रोष निर्माण झाला. इमारत  नवीन असल्याने वाहनतळ नाही, इमारतीच्या आवारात पुरेशी जागा नाही.

तीन दिवस डांबून ठेवून एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार,गुन्हा दाखल 

त्यामुळे इमारतीबाहेरील रस्त्याकडेला वाहने उभी करण्याशिवाय पर्याय नाही, अशा तक्रारी वाहतूक पोलिसांना प्राप्त होऊ लागल्या. पोलिसांनी प्रत्यक्ष माहिती घेतली असता या तक्रारींमध्ये तथ्य आढळले कि नाही हे कोणालाही माहित नाही मात्र तहसीलदार कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आपापली वाहने रस्त्याकडेला उभी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

जिल्ह्यमधील एकाच घरातील दहा जणांना कोरोनाची लागण ….

Related Posts
1 of 1,301

अशा गरजवंतांकडून रस्त्याकडेला वाहने उभी करण्याबाबत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्रस्ताव आल्यास संबंधित रस्त्यावरील वाहनांची रहदारी, रस्त्याकडेला वाहने उभी के ल्यास वाहने, पादचाऱ्यांना होणारा संभाव्य अडथळा, संबंधित इमारत, व्यावसायिक आस्थापनेव्यतिरिक्त अन्य वाहने तेथे उभी राहणार नाहीत, याची हमी हे आणि अन्य निकष पडताळून प्रस्ताव सादर करणाऱ्या वाहनांसाठी तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याकडेला वाहने उभी करण्याची परवानगी दिलीजाणार होती पण ते कागदावरच राहिले .त्यामुळे तहसील कार्यालयात येणारे कर्मचारी अधिकारी यांचीही वाहने नो पार्किंग फलकाच्या अगदी उरावर लावली जात आहेत त्यामुळे नो पार्कींग फलक फक्त नावाला उरला असून या ठिकाणी मिळणारी पार्किंगसाठीची जागा आला लोकांना हक्काची पार्किंग वाटू लागली आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही . 

राज्यात लॉकडाउन हा शेवटचा पर्याय  – आरोग्यमंत्री राजेश टोपे 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: