Rice Price Today: सर्वसामान्यांना धक्का, तांदळाचे भाव आणखी वाढणार; जाणुन घ्या संपूर्ण माहिती

0 9

 

Rice Price Today: येत्या काळात तांदळाच्या दरात (rice price) आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात कमी उत्पन्नाचा अंदाज आणि गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीत 11 टक्क्यांची वाढ लक्षात घेता वाढीचा कल आणखी कायम राहण्याची शक्यता आहे. अन्न मंत्रालयाने ही माहिती दिली.

 

निर्यात धोरणात बदल केले
मंत्रालयाने दिलेल्या माहितीत, भारताच्या तांदूळ निर्यात धोरणात नुकत्याच झालेल्या सुधारणांमागील तपशीलवार कारणे स्पष्ट करण्यात आली. मंत्रालयाने असेही म्हटले आहे की भारताच्या तांदूळ निर्यात नियमांमध्ये अलीकडील बदलांमुळे निर्यातीसाठी उपलब्धता कमी न करता “देशांतर्गत किमती नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली आहे”.

 

तुटलेल्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी
सप्टेंबरच्या सुरुवातीला सरकारने तुटलेल्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आणि बिगर बासमती तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क लादले. अन्न मंत्रालयाने वस्तुस्थिती पत्रकात म्हटले आहे की, “देशांतर्गत तांदळाच्या किमती वाढीचा कल दर्शवित आहेत आणि सुमारे 6 दशलक्ष टन धानाचे कमी उत्पादन आणि गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीत 11 टक्के वाढ होण्याच्या अंदाजामुळे त्या वाढू शकतात आहे.’

 

Related Posts
1 of 2,179

चीनमध्ये अन्न संकट निर्माण होऊ शकते
भारतातून होणाऱ्या निर्यातीवर बंदी घातल्याने चीनमध्ये अन्न संकट निर्माण होऊ शकते. सरकारच्या या निर्णयामुळे भाव कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र आता सरकारने दिलेल्या माहितीत दर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

भारत हा तांदूळ उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे
चीननंतर भारत हा सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश आहे. जागतिक बाजारपेठेत भारतातील तांदळाचा वाटा 40 टक्के आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताने 21.2 दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला आहे. त्यात 34.9 लाख टन बासमती तांदूळ होता. भारतातील चालू खरीप हंगामात भात पिकाखालील क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: