सुरेगाव येथील जंगलात खून झालेल्या अज्ञात व्यक्तीची माहिती देणाऱ्यास बेलवंडी पोलीस ठाण्याकडून बक्षीस

0 80
minor son, kills father; Because the police were shocked to hear

 

श्रीगोंदा प्रतिनिधी: तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाणे हद्दीतील सुरेगाव शिवारात फॉरेस्ट जंगलात अनोळखी व्यक्तीचा हत्याराने वार करून पोत्यात बांधून टाकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यावरून बेलवंडी पो.स्टे. गुरनं. ५०९/२०२२ भादंवि क. ३०२,२०१ प्रमाणे
दि.३०/११/२०२२ रोजी दाखल झाला होता.

 

सदरचा गुन्हा हा दि. ३०/११/२०२२ रोजी १०.३० वा. चे पुर्वी घडलेला होता. सुरेगाव शिवारात फॉरेस्ट जंगलात शेतगट नं.८३ जांभळपटटीकडे जाणारे रोडलगत कोणीतरी अज्ञात आरोपीने अनोळखी पुरुष वय अंदाजे ६० वर्षे, यास काहीतरी कारणावरुन कोणत्यातरी टनक हत्याराने त्याचे डोक्यावर मारुन खुन केला आहे. व प्रेत दोन्ही
बाजुने (डोके व पायाकडुन) पोत्यात बांधुन जंगलात आणुन टाकला आहे.

 

Related Posts
1 of 2,427

सदर गुन्हयातील मयत अनोळखी पुरुष याचे वय अंदाजे ६०वर्षे असून त्याचे अंगात खाकी रंगाची जिन्स पॅन्ट त्यावर Gunuie Jeans असे लिहिलेले व एक विविध (निळसर, गुलाबी, पिवळे) रंगाचे ब्लॅकेट आहे.उजवे पायाचे पोटरीवर जुनी जखम आहे. सदर गुन्हयातील अनोळखी मयत पुरुष असल्याने त्याची ओळख पटविणे आहे. तसेच गुन्हयाचे संदर्भाने कोणास काही माहिती देण्याचे आवाहन बेलवंडी पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

 

*माहिती देणारास बक्षीस*
सदर गुन्हा व अनोळखी मयत व्यक्तीविषयी कोणास काही माहिती असल्यास तात्काळ आमचा मोबाईल फोन नं. ७३५००५०८८८ व बेलवंडी पोलीस स्टेशन फोन क्रमांक
०२४८७२५०२३३ यावर फोन करुन माहीती दयावी. माहीती देणारास योग्य ते बक्षिस देण्यात येईल व त्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. – श्री. मच्छिंद्र खाडे,पोलिस निरीक्षक, बेलवंडी पोलिस ठाणे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: