श्रीगोंद्यात एकलव्य संघटनेची आढावा बैठक संपन्न.. ..

या बैठकीचे अध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे (महाराष्ट्र राज्य अध्यक्ष) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी समाजातील विविध प्रश्नांबरोबरच समाजाला लाभलेला ऐतिहासिक वारसा नमूद केला. त्यांनी सांगितले की, महाराणा प्रतापानां पूजा भिलाने संरक्षण दिले होते, इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य लढ्यात हनुमंत भिल्ल लढला, काळू नाईक हे इंग्रज अधिकाऱ्याच्या विरुद्ध लढले, शाहू महाराजांच्या विश्वासू रक्षकांमध्ये कान्ह्या भिल्ल होता. असा समाजाचा इतिहास आहे. याचबरोबर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अजूनही समाजाचे कूपन, जाती दाखला, मतदार नोंदणी या सारख्या सामान्य गोष्टी पूर्ण झालेल्या नाहीत. ज्या शेतजमिनी आदिवासी भिल्ल समाज अतिक्रमण करून वास्तव्यास आहे. त्या जमिनीतील अतिक्रमण नियमाकुल करणे बाबत चर्चा येथे करण्यात आली.यानंतर दत्ता माळी (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष) बोलतांना म्हणाले की, समाजाचे अजूनही बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. समाजातील अनेक लोकांचे जातीचे दाखले नाहीत, मतदार यादीत नोंद नाही, रेशन कार्ड अजून मिळालेले नाही. सरकारी तलावांमध्ये मच्छीमारी करणाऱ्यांना स्थानिकांकडून पीळवले जाते. समाज बांधवांना सरकारी तलाव मच्छीमारीसाठी प्राधान्याने उपलब्ध व्हावे. असे माळी यांनी यावेळी बोलतांना सांगितले.