
प्रतिनिधी DNA मराठी टीम
श्रीगोंदा – महसूल कर्मचारी संघटना प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी चार एप्रिलपासून बेमुदत संपावर गेल्याने श्रीगोंदा तहसील (Shrigonda Tehsil) कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्यांचे गैरसोय झाली आहे.
शासन निर्णय 1 मे 2021 अन्वये राज्यस्तरीय केलेला नायब तहसीलदार संवर्ग रद्द करावा ,अव्वल कारकून मधून नायब तहसीलदार पदोन्नतीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, महसूल सहाय्यकांची रिक्त पदे तात्काळ भरावी, तातडीने भरती प्रक्रिया राबवावी , नायब तहसीलदार ग्रेड पे 4300 वरून 4600 करावा दांगट समितीच्या अहवालानुसार आकृतीबंध लागू करावा,दांगट समितीच्या अहवाल प्रसिद्ध करून अंमलबजावणी करावी, संजय गांधी निवडणूक रो. ह. यो. पी एम किसान वगैरे महसूल इतर कामासाठी स्वतंत्र पदे निर्माण करावीत, बऱ्याच कालावधीपासून अस्थायी असणारी पदे कायम करावी, सुधारित निकषानुसार पदोन्नतीची प्रक्रिया विहित कालमर्यादेत पूर्व करावी , नियमानुसार पात्र चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना वर्ग-3 महसूल सहाय्यक पदी पदोन्नती द्यावी, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा पदोन्नती कोठा 25 टक्के वरून 50 टक्के करावा ,कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना पदोन्नती कोठा 40% केला त्याप्रमाणे भरती करावी, नवीन 27 तालुक्यात महसुली इतर कामाकरता पदनिर्मिती करून पदे तात्काळ भरावीत ,गृह विभागाचे धर्तीवर महसूल कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा प्रलंबित प्रस्ताव मंजूर करावा.
राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दरवर्षी नियमा नियमितपणे पार पाडाव्यात. गौण खनिज विभागात खनिकर्म निरीक्षक हे अ. का .दर्जाचे पद निर्माण करावे. महसूल दिन दरवर्षी राज्य विभाग व जिल्हा स्तरावर साजरा करावा व त्याकरिता निधी उपलब्ध करावा.अशा महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या मागणीसाठी चार एप्रिल पासून महसूल कर्मचारी संघटनेचे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहे. सोमवार बाजार असल्याने कामानिमित्त श्रीगोंदा तहसील कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्यांचे गैरसोय झाली.