भारतीय संघाला विजयापासून रोखण्यासाठी असलेला इंग्लंडचा तो मास्टर प्लॅन उघड

0 41
 नवी मुंबई –  भारतीय संघ ४ ऑगस्ट पासून इंग्लंड संघाविरुद्ध चार कसोटी (England vs India) सामन्यांची मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाची ही पहिली मालिका असणार आहे.  या मालिकेचा  पहिला सामना जिंकून या  मालिकेत आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा पर्यंत असणार आहे. मात्र बीसीसीआय ने आपल्या ट्विटरअकाउंट वरून शेयर केलेल्या एक फोटो मुळे भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे.

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) नॉटिंगहॅममधील पिचचा एक फोटो शेअर केला आहे ,तो फोटो पाहून भारतीय फॅन्सची तसेच संघाची देखली काळजी वाढली आहे. याचं कारण म्हणजे या पिचवर भरपूर गवत आहे. त्यामुळे या पिचवर भारतीय बॅट्समनची चांगलीच कसोटी लागणार आहे. इंग्लंड मधील थंड वातावरण आणि उसळत्या ड्यूक्स बॉलर भारतीय बॅटिंग ऑर्डर अनेकदा कोसळली आहे. त्यामुळे नॉटिंगहॅम टेस्टमध्येही हीच अवस्था राहिली तर टीम इंडिया अडचणीत येऊ शकते.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला इंग्लंडमध्ये एकही टेस्ट मालिका जिंकता आलेली नाही. या मालिकेपासून वर्ल्ड टेस्ट सीरिजला (2021-23) देखील सुरुवात होत आहे. त्यामुळे ही मालिका जिंकून नव्या सीरिजची जोरदार सुरुवात करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे.

MSRTC Recruitment 2021, 8वी उत्तीर्ण उमेवारांसाठी नोकरीची संधी

Related Posts
1 of 48

फेब्रुवारी महिन्यात भारताच्या दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाला त्यावेळी भारतामधील स्पिन बॉर्लसना मदत देणाऱ्या पिचवर ब्रिटीश बॅटींगची वाताहत झाली होती. भारताने स्पिन बॉलर्सच्या जोरावर ती मालिका 3-1 नं जिंकली. आता इंग्लंडची टीम या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करणार आहे. इंग्लंडकडं जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे अनुभवी बॉलर्स आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: