हे घोटाळा ही उघड करा, संजय राऊतांचा सोमय्यांना टोला, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

0 224

नवी दिल्ली –   मागच्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षा (BJP) चे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार (MVA) मधील नेत्यांवर आणि मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे भ्रस्टाचारा (Corruption) चे आरोप लावत आहे.  या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा करून हे घोटाळाही उघड करा,असं राऊतांनी आपल्या पत्रात म्हटलंय.(Reveal this scam, Sanjay Raut’s attack on Somaiya, find out the whole case)

एकच व्यक्ती भ्रष्टाचाराच्या नावाने ओरडतेय, दुसरं काही महाराष्ट्रात होत नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधात सगळ्यांनी लढाई केली पाहिजे. जे लढतात त्यांच्याकडे अजून काही प्रकरण पाठवावीत असं मला वाटतं. मी हे प्रकरण ईडीकडे देईन. पिंपरी-चिंचवड महापालिकेमधील 700 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. यापूर्वीच्या सरकारमधील अनेक लोकांचा सहभाग या घोटाळ्यात असल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी केलाय.

संजय राऊतांचं किरीट सोमय्यांना पत्र

दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. स्मार्ट सिटी अंतर्गत हा घोटाळा झाला आहे. ईडी, सीबीआय आणि सोमय्यांनी चौकशीसाठी पुढाकार घ्यावा, असं आव्हान राऊत यांनी पत्राद्वारे केलाय. पत्रातील माहितीच्या आधारे सोमय्या ईडीकडे घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाठपुरावा करतील, अशी अपेक्षाही राऊत यांनी व्यक्त केलीय.

एक भ्रष्टाचाराचं प्रकरण माझ्या निदर्शनास आलं असून ते अत्यंत गंभीर आहे. त्यात तुम्ही लक्ष घालावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. मी पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्यावर नगरसेविका सुलभा उबाळे आणि अन्य काही नगरसेविकांनी काही कागदपत्रं दिली. त्यातून असं दिसून येतं की पिंपरी-चिंचवडच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाल्या. तुम्ही हा घोटाळा उघडकीस आणावा, अशी मी विनंती आहे. 2018 – 2019 या काळात काही कोटींचा घोटाळा स्मार्ट सिटी प्रकल्पात झाल्याचंही सोमय्या म्हणाले.(Reveal this scam, Sanjay Raut’s attack on Somaiya, find out the whole case)

Related Posts
1 of 1,494

काँग्रेसमध्ये इनकमिंग …….! राजकीय गोटात हालचालींना वेग

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: