कोरोनामुळे गणेशोत्सवावर निर्बंध, बजरंग दलाचे भाजप सरकारविरोधात आंदोलन

0 282

बंगळुरू –  राज्यात वाढत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहत कर्नाटक सरकार (Government of Karnataka) ने  यावेळी गणेशउत्सवावर (Ganeshotsav) बंदी घातली आहे. या निर्बंधाच्या आधीन राहून बंगळुरू महानगर पालिकेने 3 दिवस उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे. कर्नाटकाच्या इतर भागात मात्र 5 दिवस उत्सव साजरा करण्याची परवानगी आहे.

बंगळुरू महापालिकेचे आयुक्त गौरव गुप्ता यांनी निर्बंधांसंदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की ‘गणेशोत्सव 3 दिवसांपेक्षा जास्त काळ साजरा करता येणार नाही. मुर्ती घरी आणताना आणि विसर्जित करताना मिरवणुका काढण्यास परवानगी नसेल.  घरातल्या गणपतीचे घरातच किंवा फिरत्या हौदात विसर्जन करावे असे आवाहनही गुप्ता यांनी केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठीही नियम घालून दिले असून एका वॉर्डात एकाच गणपतीला परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठीही महापालिका आणि पोलीस उपायुक्तांची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

शिवसेना काँग्रेसशी कधीही कट्टरविरोधी नव्हती- खासदार शरद पवार

Related Posts
1 of 1,640

गणेशोत्सवावर कोरोनामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad) , हिंदू जागरण वेदिके(Hindu Jagran Vedike)  आणि बजरंग दला (Bajrang Dal) ने गुरुवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी बंगळुरू महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी महापालिकेच्या मुख्यालयातही घुसण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी आंदोलनासाठी ट्रकमधून गणेशाची भव्य मुर्ती ही आणली होती. कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत आंदोलक गाड्या भरभरून महापालिका मुख्यालयाबाहेर पोहोचले होते. कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात होता, त्याच पद्धतीने आपल्याला यंदाच्या वर्षी तो साजरा करायला मिळाला पाहिजे अशी आंदोलकांची मुख्य मागणी होती.

हे पण पहा – महिला सरपंचाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून मारहाण

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: