DNA मराठी

कत्तलीसाठी चाललेल्या जनावरांची सुटका….

कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंशीय जनावरे निर्दयीपणे दाटीवाटीने बांधून घेऊन होते.

0 11

कत्तलीसाठी चाललेल्या जनावरांची सुटक
अहमदनगर ः कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंशीय जनावरे निर्दयीपणे दाटीवाटीने बांधून घेऊन जात असताना सदरचा ट्रक गोरक्षकांनी विळदघाटात पकडला. पोलिसांच्या मदतीने ११ जनावरांची सुटका केली आहे. याप्रकरणी दोघांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनैतिक संबंधातून सख्ख्या मेहुण्याचा तुकडे करुन खून….
जावेद हारूण खान (रा. रामसर जिबाडमेर, राजस्थान) व नितीन बोठे (रा. वाळकी ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विळद बायपास रोडवर एका मालट्रकमध्ये गोवंशीय जनावरे दाटीवाटीने कोंंबून घेऊन जात असल्याचे काही गोरक्षकांना आढळून आले. त्यांनी सदरचा मालट्रक थांबवून एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.

 

Related Posts
1 of 2,494

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मालट्रकमध्ये (जीजे २४ व्ही ९८३३) नऊ मोठ्या जर्सी गायी व दोन वासरे दाटीवाटीने बांधून ठेवल्याचे दिसून आले. पोलिसांनी या मालट्रक मधील जनावरांची सुटका करत त्यांची रवानगी अरणगाव रोडवरील पांजरपोळ गोशाळेत केली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: