राज ठाकरेंच्या “त्या ” वक्तव्यावर उत्तर देत रोहित पवार म्हणाले…

0 390

 अहमदनगर –  राज्यातील जातीपातीच्या राजकारणाविषयी बोलत असताना राज ठाकरेंनी (Raj Thackeray)  राज्यातील जातीपातीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार आहे अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात  राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु झाले आहे. राज ठाकरे यांच्या त्या विधानावर आता कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उत्तर दिला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत राज ठाकरे यांना उत्तर दिला आहे. (Replying to Raj Thackeray’s “that” statement, Rohit Pawar said )

आपल्या ट्विट मध्ये रोहित पवार म्हणाले कि राज ठाकरे हे अद्भूत वक्तृत्व शैली असलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘लाव रे तो व्हिडिओ…’ च्या वादळी सभांमुळं उडालेली धूळ डोळ्यात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर लगेच लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणायचं असेल तर एकच पर्याय होता, तो म्हणजे जातीयवाद वाढवणं! म्हणून विरोधकांनी विकासाऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय! असे रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहे.

नेमका काय म्हणाले होते राज ठाकरे 

राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झाला आहे. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला”, असं राज ठाकरे म्हणाले होते. “कोण आहे हा जेम्स लेन? त्याने पुस्तक लिहिलं. तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? तो आता कोण आहे? कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणातून हे सगळं डिझाईन झालं आहे. त्यातून शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा सांगितला गेला, ते करणारे अमुक जातीचे लोक आहेत वगैरे बोललं गेलं, असंही राज ठाकरेंनी यावेळी नमूद केलं होतं.

 महिला तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडियो सुसाईड नोट व्हायरल

मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत. मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावं. एका चॅनलला मी मुलाखत दिली. गेल्या ७५ वर्षांमध्ये आपण काय कमावलं आणि गमावलं याचा उहापोह त्यात होता. मी त्यांना हेच सांगितलं की आपण वैचारिकदृष्ट्या जोपर्यंत प्रगत होत नाही, तोपर्यंत आपल्याकडे कितीही चांगल्या गोष्टी आल्या, तरी आपली प्रगती होणार नाही. आपण वैचारिकदृष्ट्या प्रगत झालो का? या अनुषंगाने माझी भूमिका होती, असं राज ठाकरे म्हणाले. (Replying to Raj Thackeray’s “that” statement, Rohit Pawar said )

तर मात्र आपल्याला लॉकडाऊन लावावा लागेल – उद्धव ठाकरे

Related Posts
1 of 1,635
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: