ज्योती देवरे यांची बदली करा नाहीतर …. महसूल व तलाठी संघटने केली ही मागणी

0 426

अहमदनगर- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे ( Jyoti Deore) यांच्या विरोधात पारनेर तालुका महसूल कर्मचारी आणि तलाठी संघटनेच्यावतीने (The Revenue And Talathi Association) बेमुदत काम बंद आंदोलन सुरू झाले आहे एक तर तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली करा नाही तर आमची बदली करा अशी मागणी संघटनेने केली आहे. ( Replace Jyoti Deore, otherwise …. This is the demand made by the Revenue and Talathi Association)

एकीकडे पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके (Nilesh lanke) आणि पारनेर चा तहसीलदार ज्योती देवरे यांच्यामधील सुरु असलेला वाद शांत होताना दिसत नाही तर दुसकीकडे  महसूल कर्मचारी आणि तलाठी संघटनेने तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात  बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्याने ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Related Posts
1 of 1,608
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरोधात त्या दडपशाही आणि हुकूमशाही करत असल्याची तक्रार दोन्ही संघटना ने वरिष्ठांकडे केली होती एक वर्ष होऊनही कुठलीही कारवाई न झाल्याने शेवटी आज संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.  जोपर्यंत आमच्या मागण्यांवर निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.(Replace Jyoti Deore, otherwise …. This is the demand made by the Revenue and Talathi Association)

हे पण पहा – महिला तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडियो सुसाईड नोट व्हायरल-(Tehsildar Jyoti Deore)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: