सर्वसामान्यांना दिलासा, १ एप्रिलपासून राज्यात होणार वीजदरामध्ये बद्दल

0 15

नवी मुंबई –   पेट्रोल आणि घरघुती वापरासाठी असणारा गॅसच्या दारात होणाऱ्या वाढीवमुळे सामान्य नागरिकांच्या बजेट मध्ये अनेक बद्दल झाले आहे . अशातच राज्यातील वीजग्राहकांना थोडा दिलासा मिळणार आहे कारण कि  १ एप्रिलपासून राज्यातील वीजदर   २ टक्क्यांनी कमी  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशात इंधन दरवाढ आणि सक्तीच्या वीज देयक वसुलीने  सामान्य नागरिकांना  काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. नियामक आयोगाने सुनावणी दरम्यान एफएसी (इंधन समायोजन उपकर) फंडाच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडाचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले आहेत. मार्च २०२० मध्ये या FACच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्यास सुरुवात झाली. मार्च २० ते मार्च २१ पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, उद्योगासाठी १० टक्के वीजदर कमी करण्यात आले.

निधीवाटपात कोणत्याही विभागावर अन्याय नाही – अजित पवार

मात्र, याबाबत  वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी म्हटलं, की विजेचे दर २ टक्के कमी झाले आहेत का? हे तपासण्याची गरज आहे. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी ७ टक्क्यांनी विजेचे दर कमी झाले, असं सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात मात्र विजेचे दर ७ टक्के वाढले होते. याशिवाय गेल्या वर्षी पंचवार्षिक ऑर्डर झाली आहे. आता कोणतीही नवी ऑर्डर झालेली नाही.

Related Posts
1 of 1,292

दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळेत आणि ऑफलाइन होणार – वर्षा गायकवाड

बहुवार्षिक ऑर्डरमध्ये २० आणि २१ यांची तुलना करावी लागेल. तुलना केल्यानंतर वाढ झाली की घट झाली, हे समजेल, असंही ते म्हणाले. आतासुद्धा एका विभागात कुठे तरी कमी झाले असतील. सगळ्या विभागात विजेचे दर कमी झाले आहेत का? ते तपासावं लागेल. असंही वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यावेळी बोलताना म्हणाले.

अविनाश घुले यांची महापालिका स्थायी समिती सभापती पदी बिनविरोध निवड

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: