रेखा जरे हत्या प्रकरण – उमेशचंद्र यादव पाटील यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती  

0 9

अहमदनगर –  यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणाच्या खटल्यात मुंबईतील खात्यानाम वकील उमेशचंद्र यादव पाटील यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणारे आदेश नुकताच महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने जारी केले आहे.

प्रकरण काय – 
पुणे महामार्गावरील जातेगाव शिवारातील घाटात  ३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रेखा जरे यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर मारेकरी पसार झाले होते. मारेकऱ्यांच्या शोधासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी त्यादिवशी रात्रीपासून सहा पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिरोज राजू शेख व ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे या दोघा आरोपींना जरे यांच्या खून प्रकरणात अटक केली अटक केल्यानंतर त्यांनी आदित्य सुधाकर चोळके याने सुपारी दिल्याचे सांगितले होते.
यानंतर पोलिसांनी सागर उत्तम भिंगारदिवे व ऋषिकेश उर्फ टम्या वसंत पवार यांना कोल्हापूरमधून अटक केली होती. पत्रकार बाळ बोठे याने भिंगारदिवे याच्यासह संगनमत करूनच चोळके याला मयत जरे यांच्या खूनची सुपारी दिल्याची कबुली भिंगारदिवे याने दिलेली आहे. यानंतर पसार झालेल्या बोठे याचा शोध पोलिस अद्यापही घेत आहेत. मयत जरे यांचा खून करण्यासाठी धारदार चाकू वापरण्यात आला होता. जरे यांचा खून करण्यासाठी वापरलेले शस्त्र नेमके कोणते होते.

 

रेखा जरे हत्या प्रकरण –   पत्रकार बाळ बोठे याची अटकेची चर्चा ?

Related Posts
1 of 1,292

याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत होते. पोलिसांच्या तपासात ते हत्यार चाकू असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून तो चाकू जप्त केला आहे. जरे यांच्या गळ्यावर व खांद्याजवळ धारदार शस्त्राने वार केल्यामुळे जखम झाली होती. ही जखम झाल्यावरच रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या. त्यावेळी झालेल्या झटापटीत जरे यांच्या खांद्याजवळ चाकू लागल्याचे समोर आले होते. त्याला शोधण्यासाठी स्टॅंडिंग वॉरंट जारी करण्यात आला आहे. परंतु पोलीसांना अद्यापही जरे यांच्या खूनाचे कारण स्पष्ट झाले नाही, यामुळे पसार बाळ बोठे याला पोलिसांनी अटक केल्या केल्यानंतरच घटनेतील खरे कारण पुढे येणार आहे.

चोरी गेलेल्या स्कॉर्पियोसह आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी केले अटक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: