‘इंडिया बुक रेकॉर्ड’ मध्ये शहरातील १४ वर्षीय विद्यार्थीची नोंद झाल्याबद्दल आ. संग्राम जगताप यांच्याकडून अभिनंदन

0 127

अहमदनगर –    संपूर्ण भारतभर नुकत्याच झालेल्या ‘रुबिक क्यूब’ (Rubik’s Cube) स्पर्धेत अहमदनगर शहरातील(Ahmednagar City) १४ वर्षीय चि.सुजल लोटके याने सहभाग नोंदवला होता. सदरची स्पर्धाही ऑनलाइन पद्धतीने पार पडली,या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून खेळाडू सहभागी झाले होते, या स्पर्धेमध्ये नगरचा खेळाडू सुजल लोटके याने आपल्या बुद्धिमत्तेच्या व  कौशल्याच्या जोरावर ही स्पर्धा १ मिनिटे ४० सेकंद मध्ये पार पाडून सुमारे सात प्रकारचे रुबिक क्यूब सोडविले .

संपूर्ण भारतामध्ये प्रथमच या रेकॉर्डची नोंद झाली आहे. त्यामुळे सुजल च्या यशाची नोंद ‘इंडिया बुक रेकॉर्डमध्ये’ करण्यात आली त्याच्या या यशाबद्दल संपूर्ण स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी शहराचे आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap) यांनी दिली.

हे पण पहा  – Ahmednagar breaking news | आयुर्वेद कॉनर जवळ बर्निंग कारचा थरार

यावेळी समवेत नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे,मा.नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार,नगरसेवक सुनील त्रंबके,नगरसेवक समद खान, सचिन जाधव,सचिन लोटके, महेश लोटके,संभाजी पवार,कौस्तुभ पवार, हर्षल विधाते,सागर उजागरे आदी उपस्थित होते.

राज्यात पुन्हा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, ११ जणांवर गुन्हा दाखल

Related Posts
1 of 1,603
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: