तहसीलदार व लोकप्रतिनिधी यांच्या वादाबाबत पदाधिकाऱ्यांनी दिला जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना निवेदन

0 191

अहमदनगर –  मागच्या काही दिवसांपासून पारनेर तालुक्यातील तहसीलदार आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सुरु असलेल्या वादामुळे सोशल मीडिया प्रिंट मीडिया व इले. मिडीया चे माध्यमातून पारनेर तालुक्याची बदनामी होत असल्याने पारनेर तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देत या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली आहे

या निवेदनात म्हटले आहे कि पारनेर हा सेनापती बापट व मा. आण्णासाहेब हजारे यांचे नाव लौकीक असलेला तालुका आहे. परंतु गेली १५-२० दिवसापासुन पहातो आहोत की, या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि पारनेर तहसिलदार तसेच वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी यांचेतील बाद आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती पहाता सोशल मिडीया, प्रिंटमिडीया व इले. मिडीया चे माध्यमातून तालुक्याची कधी नव्हे एवढी बदनामी व अनु राज्यभर चालू आहे. तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे सर्व थांबवणे गरजेचे आहे. या तालुक्यात गेली दोन वर्षापासून महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन हे पुर्णपणे एकतर्फी कामकाज करत आहे. त्याची झळ तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला पोहचत आहे.  वाळू तस्करी, अवैध धंदे व चोन्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलीस खाते तर निरापराध लोकांना सुध्दा अपराधी समजून धमकावत आहे. खोटेनाटे गुन्हे दाखल करत आहे. कोणतेही कामे सरळ मार्गाने होत नाहीत. तहसिल व पोलीस कार्यालयाचे आसपास सतत बाळु तस्कर अवैध व्यवसायिक व दलालांचा वावर आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनता दबावात व त्रस्त आहे.

तहसिलदार यांचे तक्रारीत गौणखनिज अधिकारी व त्यांचे सहकारी यांना पोलीस निरीक्षकासमोर मारहाण झाली. तसेच ग्रामीण रुग्णालयातील दोन महिला वैद्यकीय अधिकारी यांना आर्वाच्य भाषेत शिवीगाळ व राहुल पाटील नावाचे कर्मचारी यास मारहाण झाली व ती देखील गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक यांचे समोर झाली असा आरोप आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून याची चौकशी समिती नेमून निःपक्ष चौकशी करावी. चौकशीत सत्यता असेल तर दोषींवर कारवाई करावी व आरोप खोटे निघाल्यास लोकप्रतिनिधीची नाहक बदनामी केली म्हणुन संबंधीत कर्मचारी यांचे निलंबन करण्यात यावे.

बिकिनीतील फोटो पाठव म्हणणाऱ्या युजरला सोनाक्षी ने दिला हा मजेशीर उत्तर

Related Posts
1 of 1,481

कार्यालयातील कर्मचारी, मंडलाधिकारी व तलाठी हे कोळीड च्या परिस्थितीमध्ये आपल्याच वरीष्ठांचे विरोधात काम बंद आंदोलन करून जनतेच्या कामाची आडवनुक करत आहेत. त्यांच्याबद्दल सुद्धा जनतेची कामे वेळेवर न करणे नोंदी रखडविणे, मुख्यालयी हजर न रहाणे अशा अनेक गावातून तक्रारी आहेत. त्यांची देखील चौकशी व्हावी. त्यांचे वाद मिटणार नसतील तर तहसिलदार व आंदोलक कर्मचारी यांच्या सर्वाच्या तालुक्याबाहेर बदल्या कराव्यात अन्यथा कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील विविध  पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासमोर केली आहे.

हे पण पहा – तहसीलदार यांच्या अडचणीत वाढ, तहसीलदार यांची बदली करा नाहीतर आमची बदली करा – महसूल व तलाठी संघटना

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: