एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबद्दल, राज्य सरकारचा मोठा निर्णय…

0 249

नवी मुंबई –  आपल्या मागण्यापूर्ण होण्यासाठी मागच्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST employees) संपला यश आला आहे. राज्य सरकारने मोठा निर्णय घेत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाबद्दल महिती स्वतः परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे. (Regarding the demands of ST employees, the big decision of the state government …)

यावेळी अनिल परब म्हणाले मागील 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू होता. या संपात कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची प्रमुख मागणी होती. याबाबत सरकार म्हणून आम्ही आमची भूमिका मांडत होतो आणि माननीय उच्च न्यायालयात (High Court) हा विषय गेल्यावर त्यावेळी एक त्रिसदस्यीय समिती बनवली. विलिनीकरणाचा निर्यण 12 आठवड्याच्या आत समितीने घ्यावा असा आदेश देण्यात आला होता.

नवाब मलिकांचा पुन्हा समीर वानखेडेंवर गंभीर आरोप ट्विट करत म्हणाले…..

या विलिनीकरणाचा जो विषय आहे त्याबाबतच आपलं म्हणणं समितीसमोर मांडावं. समितीने तो अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर मांडावा आणि त्यानंतर तो उच्च न्यायालयात द्यावा असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे सरकारची भूमिका ही उच्च न्यायालयाचं पालन करणारी असल्यानं समितीचा जो काही निर्णय येईल तो आम्ही मान्य करु अशी भूमिका जाहीर केली होती असं परब म्हणाले. (Regarding the demands of ST employees, the big decision of the state government …)

Related Posts
1 of 1,518

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: