रेडमी, रियलमीला मोटोरोला देणार टक्कर; कमी किमतींमध्ये फोन लाँचिंगसाठी सज्ज

Motorola च्या Moto G22 च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.5 इंचांचा सेंटर पंच होल कटआउट आहे, जो HD Plus डिस्प्ले सह येईल. यामध्ये 90Hz चा रिफ्रेश रेट वापरण्यात आला आहे. जो गेमिंग आणि स्क्रोलिंगमचा उत्तम एक्सपीरियन्स देतो. हा स्मार्टफोन Helio G37 चिपसेटसह येईल आणि त्यात Android 12 आधारित ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.
Motorola Moto G22 च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, तर यात 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. तसेच इतर दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सल्सचे आहेत, जे डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीने या फोनमध्ये 16 मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप दिला आहे.
मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 20W फास्ट चार्जिंगसह येईल. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे, जो लॉक केलेला स्मार्टफोन बायोमेट्रिक पद्धतीने अनलॉक करण्याचे काम करतो. कंपनी यामध्ये बिझनेस ग्रेड सिक्युरिटी थिंक शील्ड वापरणार आहे, ज्यामुळे यूजर्सना चांगली सुरक्षा मिळू शकेल.
हा स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. या फोनमध्ये अनेक खास फीचर्स पाहायला मिळणार आहेत. या सेगमेंटच्या अनेक फोनमध्ये 5G सपोर्ट देखील देण्यात आला आहे.