प्रतिनिधी- DNA मराठी टीम
मुंबई – नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजने (National Aerospace Laboratories) ट्रेड अप्रेंटिसच्या विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना (Recruitment) प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवार ४ एप्रिल २०२२ पर्यंत nal.res.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. ट्रेड अप्रेंटिसच्या एकूण ७७ रिक्त पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
वायोमार्यदा
अर्जदाराचे वय १६ वर्षांपेक्षा कमी नसावे. अर्जदाराचे वय ४ एप्रिल २०२२ पासून मोजले जाईल.
निवड प्रक्रिया
वैद्यकीय चाचणीद्वारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केलेली भरती अधिसूचना पाहू शकतात.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असले पाहिजेत. तसेच, उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पदवी असणे आवश्यक आहे.