लोणावळा जाण्याअगोदर वाचा ही बातमी, प्रशासनाकडून मोठा निर्णय

0 17
पुणे –   पावसाळ्याच्या दिवसात राज्यातील नागरिकांना सर्वात जास्त आवडणारे ठिकाण म्हणजे लोणावळा होय . मात्र राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता आज पासून लोणावळामध्ये कलम १४४ लागू करण्यात आहे. त्यामुळे आज पासून पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. (Read this news before going to Lonavla, a big decision from the administration)
हे सर्व नियम आज पासून लागू करण्यात आले आहे. भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, एकविरा मंदीर परिसर, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर, भाजे धबधबा धबधबे, धरण या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात हे नियम लागू राहतील.
असे आहे नियम 

१) पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील.

२) पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे,

३) धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे,

४) पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे,

Related Posts
1 of 1,301

५) पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे.

६) वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे,

७) वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे,

८) सार्वजनिक ठिकाणी खादयपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे.

९) सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.

१०) धबधब्याच्या 1 किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी..

मागच्या  काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करत असल्याचं निदर्शनास आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar)  यांनी वारंवार आवाहन करून देखील नागरिक गर्दी करत असल्याने आजपासून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ( Read this news before going to Lonavla, a big decision from the administration)

शरद पवार राष्ट्रपती होणार का.. ? राष्ट्रवादी ने स्पष्ट केली भूमिका ….

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: