रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात जातानाच पकडला रंगेहाथ …

0 299

शेवगाव –   तालुक्यातील बालमटाकळी येथे स्वस्त धान्य दुकानातील माल रिकाम्या बारदाण्याच्या वाहनातून विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जात असताना ग्रामस्थांनी रंगेहात पकडला आणि  घटनेची माहिती शेवगावच्या तहसिलदार अर्चना पागिरे यांना दिल्यानंतर नायब तहसिलदार आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दुकानातील धान्य साठ्याचा पंचनामा केला.

याबाबत माहिती अशी की बालमटाकळी येथे स्वामी विवेकानंद पत संस्थेचे स्वस्त धान्य दुकान मंगरूळ येथील  शिवाजी शंकर काकडे हे स्वस्त धान्य दुकान चालवीत असून शनिवारी धान्य वाटप सुरू असताना ग्राहकांची दुपारी गर्दी कमी झाल्याने दुकानदाराने एम एच १६ सीए ०६०४ क्रमांकाच्या चारचाकी टेम्पो बोलावून त्यामध्ये रिकाम्या बारदाण्याचा भरणा केल्याचा बहाणा करून दुकानातील गहू तांदुळाचे ५० किलोचे असंख्य  पोते टेम्पोत टाकून घेऊन जात असताना दिगंबर पोपळघट, अन्वर शेख, लक्ष्मण फाटे यांच्यासह इतर ग्रामस्थांनी सिनेस्टाईलने रंगेहात पकडून सर्व प्रकारचा व्हिडीओ काढण्यात आला.

या घटनेची माहिती ग्रामस्थांत होताच दुकानासमोर ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली तसेच त्याची माहिती दिगंबर पोपळघट यांच्यासह इतर युवकांनी शेवगावच्या तहसिलदार अर्चना पागिरे यांना दूरध्वनीद्वारे दिल्यानंतर सुमारे दीड तासांनी नायब तहसीलदार शिवाजी सुसरे,पुरवठा विभागाचे साळुंखे हे घटनास्थळी दाखल झाले तो पर्यंत दुकानासमोर ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती आलेल्या संबधित अधिकाऱ्यांनी सदर घटनेचा ग्रामस्थ समवेत पंचनामा केला असता स्वस्त धान्य दुकानात ५० किलोच्या २४ गोण्या आढळून आल्या  त्याचा दिगंबर टोके, परमेश्वर शिंदे,मधुकर पाटेकर, संदीप शिंदे, बाळासाहेब देवढे, या ग्रामस्थांच्या उपस्थित समक्ष पंचनामा करण्यात आला.

किरीट सोमय्यांच्या आरोपांना हसन मुश्रीफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले….

Related Posts
1 of 1,291

मात्र सदर दुकानदारांनी पॉश मशीनचा वाफर न करता धान्याचे वाटप केले जात असून व ग्राहकांना  धान्य दिले तर रीतसर पावत्या दिल्या जात नाहीत असा आरोप ग्रामस्थ शेखर बामदळे यांनी अधिकाऱ्यांसमोर केला तसेच  स्वस्त धान्य चालक शिवाजी काकडे या दुकानदारांनी पॉश मशीन गायब केले व गावात नोंदणीसाठी पाठवले आहे अशी खोटी माहिती ग्रामस्थांना व अधिकाऱ्यांना दिली ग्रामस्थ दुकानदाराच्या उडवाउडवीची उत्तरामुळे अत्यंत  संतप्त झाले होते . सदर मशीन घेऊन या अशी ग्रामस्थांनी जोरदारपणे मागणी केली पण मशीन बाहेर गेले असे खोटे दुकानदारांनी सांगितले पण सदर पॉश मशीन दुकानदाराच्या जवळ असलेल्या पिशवीची ग्रामस्थांनी झडती घेतल्याने त्यामध्ये स्पॉश मशीन आढळून आल्याने ग्रामस्थ अत्यंत आक्रमक झाले होते यावेळी ग्रामस्थांनी संबंधित दुकानदाराला व अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले गेले संबंधित दुकानदाराच्या विरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत पॉश मशीन संबधित अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे त्यामध्ये काय निष्पन्न होईल तसेच वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

हे पण पहा – वॉर्ड बॉयची रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: