बलात्कार पीडितेची आत्महत्या, सुसाईड नोट मधून धक्कादायक माहिती उघड

0 548
बुलढाणा  –   मुंबईमधील साकीनाका (Sakinaka) परिसरात ३० वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्कारा(Rape) ची घटना राज्यात ताजी असताना परत एकदा राज्यातील बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात एका १८ वर्षीय  युवतीवर बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर  युवतीने  आत्महत्या केली असून आत्महत्या करण्याअगोदर तिने लिहिलेल्या सुसाईड नोट  (Suicide Note)  मधून तिच्यावर बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलीने लिहिलेली सुसाईड नोट वाचून पोलीसही हादरले.(Rape victim’s suicide, shocking information revealed from suicide note)
Related Posts
1 of 1,463

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील नांद्रा-कोळी (Nandra- koli) येथे २० सप्टेंबर रोजी एका १८ वर्षीय युवतीने आत्महत्या केली होती. या  युवतीने नेमके कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा खुलासा झाला नव्हता. मात्र काल आत्महत्येचे कारण उलगडले आहे. घरातील भगवद्गीतेमध्ये या  युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या दोन जणांची नावं तिने लिहून ठेवली होती.

धक्कादायक ! झोपलेल्या भावंडांवर घरात घुसून गोळीबार, एक जखमी

काय म्हटलं होतं चिठ्ठीत?

पीडित मुलीने चिठ्ठीत आरोपींची नावे लिहिली होती. गण्या आणि निल्याने माझ्यावर बलात्कार केला आहे. ही घटना सांगू सकत नसल्याने मी आत्महत्या करत आहे असं सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं.

ही चिठ्ठी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोन जणांपैकी एक या युवतीचा चुलत भाऊ असल्याचं या युवतीने त्या चिठ्ठी लिहून ठेवलं आहे. ही चिठ्ठी मिळताच या युवतीच्या वडिलांनी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला धाव घेतली आहे. बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ दखल घेत चिट्ठी हस्तगत करून तक्रार दाखल करून घेतली आहे. पुढील चौकशीनंतरच पोलीस विभागाकडून ठोस कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.(Rape victim’s suicide, shocking information revealed from suicide note)

हे पण पहा -Ahmednagar breaking news | आयुर्वेद कॉनर जवळ बर्निंग कारचा थरार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: