विवाहितेवर बलात्कार, व्हिडीओ बनवून पतीला पाठवला, पतीने केला व्हायरल

0 586

 नवी मुंबई –    मुंबईतील देवनार भागात मागच्या काही दिवसापूर्वी एका विवाहितेवर बलात्कार करून तिचा व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी महिलेच्या पतीलाही अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पत्नीचे अश्लील व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला घटस्फोटासाठी ब्लॅकमेल करत पतीनेच ते व्हायरल केल्याचं समोर आलं आहे.

या प्रकरणात मिळालेली अधिक माहिती अशी की  देवनार परिसरात राहणाऱ्या पीडित महिलेने यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी दोघांनाही पकडले.  ब्लॅकमेलरने आधी महिलेवर बलात्कार केला आणि या घटनेचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तिला धमकी दिली, की जर त्याला 5.20 लाख रुपये दिले गेले नाहीत, तर तो हे बलात्काराचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करेल.

आमच्या बापाने हे आम्हाला शिकवलं नाही चित्रा वाघांचा मेहबूब शेख यांच्यावर पलटवार

Related Posts
1 of 1,481

 मात्र महिलेने आरोपी ब्लॅकमेलरला पैसे दिले नाहीत, त्यामुळे त्या व्यक्तीने ते व्हिडीओ तिच्या पतीला पाठवले. पतीने ही तो व्हिडिओ पाहून पीडित महिलेला ब्लॅकमेल करुन घटस्फोट मागण्यास सुरुवात केली. इतकंच नाही, तर पतीने पत्नीचे व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. आरोपी पती मुंबईहून उत्तर प्रदेशातील श्रावस्ती येथील त्याच्या घरी पळून गेला होता. पोलिसांनी त्याला तिथून पकडले. त्यानंतर त्या महिलेवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीलाही पकडण्यात आले. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर बलात्कार, खंडणीसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

हे पण पहा – पोलिसांच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलाची आत्महत्या

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: