रणजित गुगळे यांच्या २०२२ मध्ये प्रकाशित होणाऱ्या “महात्मा” चित्रपटाची निर्मिती सुरू

0 12
जामखेड –  “डबलसीट”, “मुरब्बा”, ” गर्लफ्रेंड” व “धुराळा” अशा चार यशस्वी चित्रपटांच्याानिर्मीती नंतर सामाजिक क्षेत्रात महान कामे केलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याच्या संघर्षमय व प्रेरणादायी जीवनावर प्रकाश टाकणार्‍या “महात्मा” चित्रपटाच्या निर्मितीचे काम सुरू झाले .
 पहिल्या भागात महात्मा फुले व दुसऱ्या भागात सावित्रीबाई फुले अशा दोन भागात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या पोस्टर लाँचिंगचा कार्यक्रम नुकताच पार पडला . २०२२ या पुढील वर्षांत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपटचे निर्माते व एच. यु. गुगळे परिवाराचे सदस्य रणजित गुगळे यांनी दिली.
Related Posts
1 of 1,290

बॉक्सिंग प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ,आरोपीला अटक

HUGE प्रोडक्शनच्या माध्यमातून निर्मित होत असलेेल्या या चित्रपटाचे निर्माते म्हणून रणजित गुुगळे व अतिश जोग, दिर्ग्दशक समीर विध्दांस तर संगीतकार म्हणून प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल हे काम पाहणार आहेत. सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या महामानवांचा सन्मान व्हावा व त्यांच्या संघर्षमय जीवनापासून समाजाला प्रेरणा मिळावी या हेतूने निर्माण केलेला हा चित्रपट, चित्रपट क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.

सुधीरभाऊंचे असे विनोदी कार्यक्रम ठेवले तर लोक गर्दी करतील – संजय राऊत

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: