रानगव्याचा शेतक-यावर हल्ला शेतकरी जखमी, ग्रामस्थांनी केला पाठलाग

0 10

जामखेड –  तालुक्यातील वंजारवाडी येथे सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान शेतकरी संतोष दराडे हे शेतात काम करीत असताना अचानक गव्याने हल्ला केला यामुळे शेतकरी जखमी झाला ग्रामस्थांना माहीती समजताच त्यांनी त्याचा पाठलाग केला पण तो पळून गेला. तालुक्यात प्रथमच गव्याचे दर्शन झाले आहे. याबाबत वनखाते रेस्क्यू आँपरेशन सोमवारी करणार आहेत.

वंजारवाडी ता. जामखेड येथील शेतकरी
संतोष भिमराव दराडे हे शेतात काम करीत होते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक गव्याने त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले याच दरम्यान आजुबाजुला असलेल्या शेतकऱ्यांनी सदर घटना पाहीतल्यानंतर त्यांनी गव्याचा पाठलाग केला परंतु अंधार पडू लागल्याने गवा पळून गेला.

ग्रामस्थांनी गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेला शेतकरी संतोष दराडे यास जवळच असलेल्या फक्राबाद येथील खाजगी दवाखान्यात उपचार केले त्यास तीन टाके पडले असून प्राथमिक उपचारानंतर त्यास घरी पाठवले आहे. फक्राबाद येथील पोलीस पाटील योगिनाथ जायभाय यांनी सदर घटनेची माहिती तहसिलदार विशाल नाईकवाडे यांना दिली त्यांनी तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबीलवार यांना माहिती देऊन सदर भागात वनखात्याचे पथक पाठवण्यास सांगितले.

Related Posts
1 of 1,290

वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबीलवार यांनी तातडीने जामखेड येथील वनखात्याचे पथक वंजारवाडी येथे पाठवले असून उद्या सोमवारी रेस्क्यू आँपरेशन करणार असल्याचे सांगितले. तालुक्यातील साकत येथे रानडुकरांचा शेतकऱ्यांवर हल्ला, वनवा पेटणे तसेच बिबट्याची दहशत संपत नाही तोच रानगव्याचे दर्शन झाले यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. सध्या सुगीचे दिवस चालू असल्याने जंगलातील प्राण्यांचे दर्शन होत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: