रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ‘या’ महिन्यात करणार लग्न?

0 226

नवी मुंबई –   मागच्या काही दिवसांपासून अभिनेता (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही जोडी लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा जोराने होत आहे. हे दोघे लग्न करणार आहे मात्र कधी करणार या बाबत अनेक चर्चानी जोर धरला आहे. अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही. आलिया आणि रणबीर याच वर्षी लग्न करणार होते मात्र त्यांनी काही कारणात्सव हे लग्न पुढे ढकलले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाच्या विविध चर्चांना उधाण आलं आहे. (Ranbir Kapoor and Alia Bhatt to get married this month?)

मागच्या वर्षी अभिनेता रणबीर ने  जर कोरोना (Corona) आला नसता तर २०२० मध्येच आलियाशी लग्न केले असते मलाही लवकरच लग्नाची तारीख निश्चित करायची आहे, असे त्याने सांगितले होते. त्यामुळे ते २०२१ च्या डिसेंबर मध्ये लग्न करणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र आता हे दोघे २०२२ मध्ये एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. लग्न पुढे ढकलण्यामागे आलिया आणि रणबीर यांच्या वर्क कमिटमेंट असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे ते दोघेही त्यांच्या आगामी चित्रपटांचे शूटिंग संपवून लवकरच लग्न करतील, असं सांगितले जात आहे.

कपिल शर्मा ने घेतला होता आत्महत्या करण्याचा निर्णय , शाहरुख आला मदतीला धावून

Related Posts
1 of 84

आलिया आणि रणबीर दोघेही गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटींग आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आलिया ही ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘RRR’, ‘डार्लिंग्स’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात व्यस्त आहे. यातील ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे शूटिंग अद्याप बाकी आहे. तर रणबीर हा सध्या ‘शमशेरा’, ‘ऐनिमल’ या सारख्या चित्रपटात व्यस्त आहे.दरम्यान यातील बहुतांश चित्रपटाचे शूटींग एकतर पूर्ण झाले आहे किंवा पूर्ण होणार आहे. त्यामुळे आलिया-रणबीर या चित्रपटांचे शूटींग संपवून मगच लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे. आलिया आणि रणबीरला कोणतीही घाई न करता लग्न करायचे आहे. अशी माहिती समोर आली आहे. (Ranbir Kapoor and Alia Bhatt to get married this month?)

हे पण पहा –  फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, पहा हा भीषण आगीचा व्हिडिओ

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: