
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज सत्र न्यायालयाने त्यांना धक्का देत जामीन अर्ज फेटाळला आहे.
आता या प्रकरणात पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी होणार आहे.खासदार नवनीतच्या वकिलाने सांगितले की, ‘न्यायालयावर कामाचा खूप ताण आहे, त्यामुळे आम्ही 29 एप्रिलला जामीन अर्जाचा जबाब स्वीकारला आहे. त्यानंतर न्यायालय पुढील सुनावणीचा निर्णय घेणार आहे.
काल उच्च न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली. दोघांविरुद्ध देशद्रोहाची कलमेही जोडण्यात आली आहेत. त्यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी सांगितले की राणा दाम्पत्याने वांद्रे दंडाधिकारी न्यायालयासमोर प्रलंबित असलेली त्यांची जामीन याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला, ज्याने त्यांच्या अटकेच्या एका दिवसानंतर रविवारी त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले.
राणा दाम्पत्याला शनिवारी हनुमान चालिसाच्या पठणावरून झालेल्या वादानंतर अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 सह आयपीसीच्या कलम 15A आणि 353 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. देशद्रोहाचे कलम 124A देखील लावण्यात आले आहे.