आर्वी अनगरे ग्रुप ग्रामपंचायतिच्या सरपंच पदी रामभाऊ राऊत यांची बिनविरोध निवड

0 13

श्रीगोंदा  :-  श्रीगोंदा तालुक्यातीलआर्वी अनगारे येथील ग्रुप ग्रापंचायतीचे निघालेल्या आरक्षणाचा उमेदवार निवडून न आल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आरक्षण बदलून आल्यानंतर आज रोजी रामभाऊ विठ्ठल राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर तालुक्यातून शुभेच्छा वर्षाव होताना दिसत होता .

श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी अनगरे या ग्रुप ग्रामंचतीच्या सरपंच पदासाठी सुरवातीला आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जमाती स्त्री असे आरक्षण सरपंच पदासाठी निघाले होते मात्र या जमातीमधील कोणतीही स्त्री निवडून आली नसल्यामुळे त्या ठिकाणी सरपंच पद रिक्त राहिले होते तसा अहवाल तहसीलदार कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आला होता त्यावर कारवाई करत अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आदेश पारित करत आरक्षणात बदल केला .
त्यानुसार अनुसूचित जमाती पुरुष असे आरक्षण निघाले होते त्यानुसार अनुसूचित जमाती मधून श्री रामभाऊ विठ्ठल राऊत हे निवडून आले होते त्यानुसार त्यांनी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्याच्या निवडीच्या कार्यक्रमात निवडणूक निर्णायक अधिकारी म्हणून मंडलाधिकारी पेडगाव विलास अजबे यांनी काम पहिले तर त्यांना मदतनीस म्हणून आर्वी अनगरे तलाठी संजय पोटे व ग्रामसेवक अमीर शेख यांनी काम पहिले निवडीनंतर ग्रामपंचायत परिसरात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला निवड झाल्यानंतर तालुक्यातून सर्वच स्तरातून राऊत यांचेवर शुभेच्छा वर्षाव होताना दिसत होता .
Related Posts
1 of 1,290
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: