विकासाची काम कमी आणि झेंडा लावण्याचे कामे जास्त राम शिंदे यांची रोहित पवारांवर टीका

0 194
अहमदनगर –  कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)  यांनी स्वराज्य पूजन यात्रेचे शुभारंभ दि. 9 सप्टेंबर गुरुवार रोजी केला. मात्र या स्वराज ध्वज यात्रेवरून भाजपा नेते आणि माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टिका करतात रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

DNA मराठीशी बोलताना माजी मंत्री राम शिंदे म्हणाले भगवा ध्वजच्या प्रती सर्वांना अभिमान आहे.  या ध्वजासाठी योगदान देखील देण्याची गरज आहे जिथे हा ध्वज बसवणार आहे ते खर्डा किल्ला ऐतिहासिक आहे. या  खर्डा किल्ल्याच्या विकासासाठी 2017 मध्ये तत्कालीन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे आम्ही 7. 50 कोटीची रुपयांचा  प्रस्ताव दिला होता त्यापैकी 3.86 कोटी मंजूर झाले. या विकास निधी मध्ये आम्ही कामेही केली मात्र आज आमदार विकासाची काम कमी आणि झेंडा लावण्याचे कामे जास्त करत असल्याची टीका राम शिंदे यांनी केली आहे.

शेवटी विजय सत्याचाच होतो निलेश यांनी दिली “त्या” प्रकरणावर प्रतिक्रिया

Related Posts
1 of 1,603

कोरोना नियमांचे उल्लंघन –
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशाचे पालन न करता सामाजिक आणि राजकीय मेळावे घेतल्याने पोलिसांनी आमदार रोहित पवार यांच्यावर कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी माजी मंत्री राम शिंदे यांनी केली आहे.

हे पण पहा –नाशिकच्या रामसेतू परिसरात एकाची हत्या

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: