
ब्राह्मणांवर टीका करताना मांझी यांनी, “जे ब्राह्मण मांस खातात, मद्यप्राशन करतात अशा ब्राह्मणांपासून दूर राहिलं पाहिजे,” असा सल्ला उप्सथितांना दिला. तसेच, “अशा ब्राह्मणांकडून पूजा आणि धार्मिक विधी करुन घेता कामा नये,” असंही मांझी म्हणाले. “तुम्ही पूजापाठ करणं बंद करा,” असा सल्लाही त्यांनी दिला.आंबेडकर जयंतीनिमित्त सिकंदरा येथील हम पार्टचे आमदार प्रफुल्ल मांझी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.