DNA मराठी

Rajya Sabha elections: शिवसेनेतून ‘या’ नावांची जोरदार चर्चा

0 437
Rajya Sabha elections: Shiv Sena discusses 'that' names
 
मुंबई –  केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) नुकताच राज्यसभाच्या निवडणुका (Rajya Sabha elections) जाहीर केले आहे. या निवडणुकीसाठी  प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या तयारीला देखील लागला आहे. राज्यात विधानसभाचा गणित पहिला तर राज्यातून राजसभेवर शिवसेना(Shiv Sena) , राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाचे एक एक उमदेवार सहज जाऊन शकतात तर भारतीय जनता पक्षाचे (BJP) दोन उमदेवार जिंकू शकतात. या निवडणुकीसाठी अद्याप तरी कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

 

Related Posts
1 of 2,482
तर दुसरीकडे राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढवणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर या जागेसाठी उमदेवार कोण असणार याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सध्यातरी राजकीय वर्तुळात शिवसेनेकडून तीन नावांची चर्चा जोराने सुरु आहे.   संभाजीराजे (Sambhaji Raje) , चंद्रकांत खैरे आणि शिरूरचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावांची चर्चा जोराने सुरु आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि संभाजीराजे यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे समजत असल्याने संभाजीराजेंचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. तसेच संभाजीराजे यांना शिवसेनेने उमेदवारी न दिल्यास आणि संभाजीराजेंनी निवडणूक लढवायची ठरवल्यास शिवसेना मराठा समाजातील एखाद्या शिवसेना पदाधिकाऱ्याला रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.

 

महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. यात शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 106 आमदारांस, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार असे एकूण 113 आमदार आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: