
पिंपरी चिंचवड – राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) बोलताना आरोग्य भरती परीक्षांबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आरोग्य भरतीची परीक्षा आता राज्य सरकार पुन्हा घेणार आहे. त्याच्या तारखा लवकरात लवकर जाहीर केल्या जातील, अशी घोषणा त्यांनी पत्रकारणांशी बोलताना केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी (Ajit Pawar) चर्चा झाल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.
आरोग्य भरती संदर्भात विधानसभेत पोलिसांना सखोल चौकशी करण्यासादर्भत आदेश दिले होते. पोलिसांचा डिटेल अंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे. ड वर्गाचा पेपर तो पूर्ण व्हायरल झाला होता त्यामुळे आम्ही पुन्हा ‘ड’ वर्गाची परीक्षा घेणार आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केली त्यांचं ही मत लक्षात घेतलं आहे. दोन्ही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेण्याचा मंत्री मंडळाचा निर्णय आहे. त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय यामध्ये झाला आहे.
चौथ्या लाटेचे सूतोवाच नाही
राज्यातील कोरोना रुग्णांच्या (corona patients) वाढीबाबत माहिती दिली आहे. कुठेही चौथी लाट असल्याचा माझा सूतोवाच नाही. सध्या छोटी संख्या वाढत आहे. महराष्ट्राने मोठी रुग्ण संख्या पहिली आहे सध्या कोरोनाची छोटी संख्या आहे. महराष्ट्राने मोठी रुग्ण संख्या पहिली आहे. मुंबई, पुणे,नाशिक,ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढली आहे. ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहेत त्या ठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यात रुग्ण गंभीर नाही. जरी रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षण असतील असा अनुमान काढण्यात आला आहे.