राज्यात मंदिरांचे दरवाजे कधी उघडणार राजेश टोपे म्हणाले …..

0 160

जालना –  राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव सध्यातरीही कमी होत आहे. याच करणारे राज्य सरकारने अनेक निर्बंध हटवण्यात आले आहे. मात्र अद्याप राज्य सरकारने धार्मिक स्थळे खुले केले नाही.  मंदिरे भाविकांसाठी खुली केली जात नसल्याने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आली होती. राज्यात मंदिरे कधी खुले करण्यात येणार या बाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजेश टोपे म्हणाले की मंदिर उघडण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत असतात. सध्या गौरी गणपती सुरू असून त्यानंतर दसरा आणि दिवाळीचा सण देखील येणार आहे, दरम्यान, जर राज्यात कोरोना आटोक्यात आला आणि कोरोनाचे आकडे कमी झाले तर दसरा – दिवाळी नंतर राज्यातील मंदिरे पुन्हा भाविकांसाठी खुली केली जाऊ शकतात, असा सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं.  राज्यात सध्या दरदिवशी तीन ते चार हजार कोरोनाबधित रुग्णांची नोंद होत आहे. तर दुसरीकडे देशात दररोज ३० ते ४० हजार दरम्यान कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आहे.

तर विराटला सोडावा लागणार भारतीय संघाचा कर्णधारपद ….

Related Posts
1 of 1,321

प्रसारमाध्यमांशी बोलताना यावेळी राजेश टोपे यांनी साकीनाका येथे झालेल्या बलात्काराची घटना बद्दल देखील भाष्य केला. टोपे म्हणाले   सदर घडलेली बलात्काराची घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून अश्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कायद्याचा जरब आवश्यक असल्याची संतप्त प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली. महाविकास आघाडी सरकार राज्यात शक्ती कायदासंदर्भात काही सजेशन्स होते. त्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा पण झाली असून लवकरच याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात गृह विभाग आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी अपेक्षा देखील टोपेंनी व्यक्त केली.

हे पण पहा – वॉर्ड बॉयची रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: