अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर राजेंद्र म्हस्के यांचे उपोषण मागे..

0 145
Rajendra Mhaske's fast back after written assurance from officials ..

प्रतिनिधी- DNA मराठी टीम 

श्रीगोंदा :-  एप्रिल तालुक्यातील कुकडी पाणी प्रश्न,वीज, भूसंपादित जमिनीचा मोबदला यासह आदी मागण्यांसाठी पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी दि.४ एप्रिल पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. तहसीलदार मिलिंद कुलथे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता काळे साहेब, महावितरणचे चौगुले साहेब यांच्या लेखी आश्वासनानंतर काल रात्री  राजेंद्र म्हस्के यांनी उपोषण मागे घेतले.

पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता साहेब यांनी लेखी पत्र दिले आहे की, आपल्या मागणीप्रमाणे वाढीव पाणी मागणीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे.अर्धा टिएमसी वाढीव पाणी मिळाल्याशिवाय श्रीगोंदा तालुक्यातील रोटेशन पूर्ण होवू शकत नाही असे त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे कळवून वाढीव पाण्याच्या सात दिवसांची मागणी केली आहे. भूसंपादन प्रश्नासंदर्भात भूसंपादन विभाग, उपविभागीय अधिकारी व कोळवडी कार्यकारी अभियंता कार्यालय विभाग कर्जत यांनी संयुक्त बैठकीची तारीख दि.२० एप्रिल पर्यंत निश्चित केली आहे,असे लेखी पत्र कार्यकारी अभियंता यांनी दिले आहे. ‌ज्यांची जमीन भूसंपादित केली आहे त्यांच्या पैशाची मागणी केली असून ते पैसे जमा झाले की वितरण करण्याचे लेखी पत्र दिले आहे.
Related Posts
1 of 2,459
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिले आहे की, आढळगाव,कोकणगाव,भावडी,हिरडगाव, घोडेगाव चांडगाव या भागातील विज सुरळीत करण्याकरिता किमान दोन ते तीन महिन्याचा कालावधीमध्ये तांदळी दुमाला व टाकळी कडेवळीत येथील सबस्टेशन मध्ये नवीन 5 MVA ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा प्रस्ताव सादर केला असून तो अंतिम टप्प्यात आहे. या सर्व लेखी आश्वासनानंतर राजेंद्र म्हस्के यांनी उपोषण मागे घेतले.रविवार पर्यंत अर्धा टीएमसी पाणी वाढवून न भेटल्यास सोमवार दि.११ एप्रिल रोजी रस्त्यारोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदार व पोलिस निरीक्षक साहेब यांच्या कडे दिले.यावेळी एकनाथ आळेकर,माऊली मोटे,सुनिल भोस, भाऊसाहेब मांडे, राजेंद्र भोस, संतोष शिंदे, श्रीकांत भोस, महादेव म्हस्के यांसह शेतकरी बंधू उपस्थित होते.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: