राजस्थाननं टॉस जिंकला करणार गोलंदाजी , पाहा दोन्ही संघ

0 114

अबुधाबी –   आयपीएल (IPL) मध्ये आज  दोन सामने  होणार आहेत. यामधील पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात होत आहे. या दोन्ही संघाने यूएईमधील लीग सुरूवात विजयानं केली आहे.  दिल्ली कॅपिटल्सनं सनरायझर्स हैदराबादचा  8 विकेटनं मोठा पराभव केला होता. तर कार्तिक त्यागीच्या शेवटच्या ओव्हरच्या जोरावर पंजाब किंग्जवर  2 रननं थरारक विजय मिळवला.(Rajasthan will bowl after winning the toss, see both teams)

राजस्थान विरुद्धची लढत दिल्लीनं जिंकली तर ती प्ले ऑफ (Play off)  मध्ये प्रवेश करणारी पहिली टीम बनेल. पहिल्या आयपीएल विजेतेपदाची प्रतीक्षा असलेल्या दिल्लीनं आत्तापर्यंत 9 पैकी 7 मॅच जिंकल्या असून त्यांचे 14 पॉईंट्स आहेत. तर राजस्थानची टीम 8 मॅचनंतर 4 विजय आणि 4 पराभवासह पाचव्या क्रमांकावर आहे.

हे पण पहा  –वकिलाच्या वेशात आलेल्या दोघांकडून जितेंद्र गोगीवर गोळीबार

या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा  कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) नं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीनं राजस्थान विरुद्धच्या लढतीसाठी एक बदल केला आहे. दिल्लीचा ऑल राऊंडर मार्कस स्टॉईनिसला पहिल्या मॅचमध्ये दुखापत झाली होती. त्याच्या जागी ललित यादवचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. राजस्थानच्या टीममध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. एविन लुईस आणि ख्रिस मॉरीस या दोघांच्या जागी डेव्हिड मिलर आणि तरवेझ शम्सी यांची समावेश करण्यात आला आहे.

Related Posts
1 of 65
  दिल्ली कॅपिटल्स : शिखर धवन, पृथ्‍वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (Rishabh Pant), शिमरन हेटमायर, ललित यादव, अक्षर पटेल, आर अश्विन, कगिसो रबाडा, आवेश खान, एनरिक नॉर्खिया

राजस्थान रॉयल्स : यशस्‍वी जायसवाल, संजू सैमसन, लियाम लिविंगस्‍टोन, डेव्हिड मिलर, महिपाल लोमरोर रियान पराग, ख्रिस मॉरिस, राहुल तेवतिया, कार्तिक त्‍यागी, चेतन सकारिया, मुस्‍तफिजुर रहमान (Rajasthan will bowl after winning the toss, see both teams)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: