
राज ठाकरे यांच्या सभेनंतर MIM ने घेतला मोठा निर्णय
औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर एआयएमएमची (AIMIM) देखील भव्य सभा होणार आहे. यामुळे आता राज्यात मनसे विरुद्ध एमआयएम संघर्ष पहिला मिळण्याची शक्यता आहे. एमआयएम प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) यांनी यासंदर्भात सुतोवाच केला आहे. मनसे आणि शिवसेनेला सभेसाठी परवानगी मिळत असेल तर मग आमच्यावर प्रतिबंध आहेत का? आम्हीदेखील औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर भव्य सभा घेऊ, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.