राज ठाकरेंनी वसंत मोरेंबद्दल घेतला निर्णय; केली मोठी कारवाई

0 373
Raj Thackeray decides about Vasant More; take big action

प्रतिनिधी- DNA मराठी टीम 

पुणे –  गुढी पाडव्याच्या दिवशी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे काढून न टाकल्यास त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर मनसेमध्ये (MNS) रोज काहींना काही घडत आहे. कोणी या भूमिकेचा समर्थन करत आहे तर पक्षामध्येच कोणी या भूमिकेचा विरोध करत आहे.  मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी देखील या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेत शहरात भोंगे लावणार नसल्याचं जाहीर केलं. यातच आता राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेत वसंत मोरेंना पुणे शहर अध्यक्षपदावरून हटवले आहे. आज राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी पाचारण केलं असताना वसंत मोरेंना त्यातून वगळण्यात आलं होतं.

मनसेनं अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून यासंदर्भातली घोषणा केली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!” अशी पोस्ट फेसबुकवर करण्यात आली आहे. या पोस्टसोबत राज ठाकरे साईनाथ बाबर यांना जबाबदारीसंदर्भातलं पत्र सोपवत असल्याचा फोटो देखील पोस्ट करण्यात आला आहे.

वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये मी माझ्या प्रभागामध्ये हनुमान चालीसा वाजवणारे भोंगे मशीदींसमोर लावणार नाही असं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी त्यांनी आपण राज ठाकरेंवर किंवा पक्षावर नाराज नसल्याचं म्हटलं होतं. “मी एक क्लिअर करतोय की माझी राज ठाकरेंवर किंवा पक्षावर कुठलीही नाराजी नाहीय. पण राजसाहेबांचं भाषण आमच्या कार्यकर्त्यांना कळलंच नाही,” असं सांगितलं होतं. आम्ही आमच्या प्रभागांमध्ये भोंगे न लावता शांतता राखण्याला प्राधान्य देणार असल्याचं वसंत मोरेंनी स्पष्टपणे सांगितलं होतं.

Related Posts
1 of 2,357

गुढी पाडव्याला राज ठाकरेंनी ही भूमिका मांडल्यानंतर मनसेच्याच काही मुस्लीम कार्यकर्त्यांनी देखील आपली नाराजी बोलून दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी भूमिकेला विरोध केला होता. वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर या दोघांच्या प्रभागात जवळपास ७० टक्के मुस्लिम मतदार आहेत.

दरम्यान, “मी अकरा महिन्यांसाठीच शहरध्यक्षपद राज ठाकरे यांच्यकडून मागून घेतले होते. साईनाथ बाबर यांची निवड झाली आहे. मला अनेक पक्षांच्या ऑफर आहेत. मी मात्र मनसेतच राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार नाही. पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्षातच राहीन”, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: