राज कुंद्राच्या अडचणीत पुन्हा वाढ; ‘त्या’ प्रकरणात ईडीने दाखल केला गुन्हा

मुंबई – बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यवसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) विरुद्ध यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. त्यांना मागच्या वर्षी मुंबई पोलिसांनी पॉर्नोग्राफी (Pornography) प्रकरणात अटक केली होती. तर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंगचा (Money laundering) गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईजवळील मड आयलंड आणि अक्सा येथील बंगल्यांमध्ये या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. अभिनेते आणि अभिनेत्रींना न्यूड सीन करण्यास भाग पाडले जात होते. या कामासाठी त्याला धमक्याही देण्यात आल्या होत्या. या अश्लील चित्रपट अॅपवर अपलोड करण्यात आले होते. या अॅपवर चित्रपट पाहण्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागत होते. अशा प्रकारे अवैध धंद्यातून काळ्या पैशाचा आरोप मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर होत आहे.