राज कुंद्राला जामीन मंजूर , शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर म्हणाली…

0 448

नवी मुंबई –  बॉलीवूड (Bollywood) मधील चर्चित अभिनेत्री पैकी एक असलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Actress Shilpa Shetty) चा पती व्यवसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी मागच्या काही दिवसांपूर्वी पॉर्नोग्राफी (Pornography) प्रकरणात अटक केली होती. आता या प्रकरणात मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून राज कुंद्राला जामीन ( Bail) दिली आहे. हि जामीन  50 हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने राज कुंद्राला दिली आहे . पतीचा जामीन मंजूर झाल्यानंतर शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

शिल्पाने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शिल्पाने इंद्रधनुष्य असलेला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर ‘एका मोठ्या वादळानंतरच सुंदर इंद्रधनुष्य दिसते. हे इंद्रधनुष्य वादळानंतरदेखील अनेक चांगल्या गोष्टी होऊ शकतात हे सांगते’ या आशयाची पोस्ट शिल्पाने केली आहे.

किरीट सोमय्या यांचा मोर्चा आता मुख्यमंत्रीकडे, दिला “हा” इशारा

शिल्पा शेट्टीने नोंदवला होता जबाब

Related Posts
1 of 84

शिल्पाच्या साक्षीनुसार, राज कुंद्रा यांने २०१५ मध्ये “विआन इंडस्ट्रीज ली.’ नावाची कंपनी सुरू केली होती. त्या कंपनीमध्ये शिल्पा शेट्टीचे २४.५० टक्के समभाग होते. या कंपनीत शिल्पा एप्रिल २०१५ ते जुलै २०२० या कालावधीत संचालक पदावर होती. त्यानंतर तिने वैयक्तिक कारणास्तव संचालकपदाचा राजीनामा दिला असल्याचे साक्षीत सांगितले. हॉटशॉट अ‍ॅप व बॉली फेम या संदर्भात आपल्याला काही माहिती नसल्याचे तिने सांगितले. कामात व्यस्त असल्याने पती राज कुंद्रा काय करतो त्यांना माहिती नसल्याचे शिल्पाने जबाबात सांगितले आहे.

हे पण पहा – चंद्रकांत पाटलांनी भाजपात येण्याची ऑफर दिली होती – हसन मुश्रीफ

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: