गारपिटाचा पाऊस (Garpitacha Paus) नगर शहरासह परिसरात गारपीट
मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात गारपिटासह पावसाची Garpitacha Paus

अहमदनगर – राज्यात वादळी वाऱ्यासह गारपिटाचा पाऊस (Garpitacha Paus) होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती त्यानुसार आज दुपारी दीडच्या सुमारास पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. नगर शहरासह परिसरात गारपीट झाली. Rain with hailstorms with city town
व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करणाऱ्यावर गुन्हा Blackmail based on video
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान राज्यात मराठवाडा, कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात गारपिटासह पावसाची Garpitacha Paus शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता नगर शहरासह परिसरात खरी ठरली आहे. नगर शहरात वादळी वाऱ्यासह पावसाला दीडच्या सुमारास सुरवात झाली. पावणे दोनच्या सुमारास शहरासह परिसरात वादळी पावसासह गारापीट झाली.
जुनी पेन्शनसाठी भरलेल्या शाळा सोडल्या… A few schools were filled in a row in the city.
गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने राज्यातील बहुतांश भागातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटामुळे केळी, गहू आणि द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील मराठवाड्यामध्ये हिंगोली, नांदेड, लातूर. या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
वादळी पावसाचा इशारा कोकणमधील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या भागात पाऊस होणार आहे तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव याभागात विजांसह पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या शक्यतेनुसार वरील जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.