गुटखा प्रकरणात पोलीस नाशिक परिक्षेत्र व पोलीस मुख्यालयामध्ये तक्रारीचा पाऊस

श्रीगोंदा ;- श्रीगोंदा शहरापासून काही अंतरावर काष्ठी श्रीगोंदा रोडवर हॉटेल अनन्या जवळ पोलिसांनी केलेल्या कारवाई बाबत पोलिसांच्या विरोधात नाशिक परिक्षेत्र पोलीस आयुक्त यांच्याशी मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार झाला असून पोलीस महासंचालक यांनाही पत्रव्यवहार झाला असून यामध्ये आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन मुंबई या ठिकाणी देण्यात आले आहे.
श्रीगोंदा काष्ठी रोडवर हॉटेल अनन्या जवळ मध्यरात्रीच्या सुमारास श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी यांनी गुटखा लुटला आणि याबाबत गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चर्चा रंगताना दिसत आहेत याबाबत DNA मराठी मध्ये बातम्या झळकल्या नंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे तसेच नाशिक परिक्षत्राचे पोलीस महानिरीक्षक शेखर पाटील यांच्याशी मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार झाला असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे कि श्रीगोंदा पोलिसांनी वरिष्ठांच्या सांगण्यानुसार कारवाई केली आहे यांचाच अर्थ असा आहे का ? वरिष्ठ पोलीस अधिकारी पण गुटखा प्रकरणात सामील आहेत कि काय ? तसेच गुटखा प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचा यामध्ये कोणताही संबंध नसताना पोलिसांनी आपली बाजू सावरून नेण्यासाठी पैशे देऊन आरोपी बनवले आहे त्यामुळे यातील मुख्य सूत्रधार आणि त्यांचे साथीदार पोलीस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे पोलीस महासंचालक मुंबई याना संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून गुटखा लूट प्रकरणात दोषी असणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पोलीस महासंचालक याना आझाद मैदान मुंबई या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार असल्याच्या आशयाचे निवेदन काल मुंबई पोलीस मुख्यालयात देण्यात आले आहे त्यामुळे गुटखा लूट प्रकरणात नाशिक परिक्षेत्र महानिरीक्षक व पोलीस मुख्यालय या ठिकाणी तक्रारीचा पाऊस पडत आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
नाव मोठे पन दर्शन खोटे
श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील एक पोलीस श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांची पुणे ग्रामीण या ठिकाणी बदली करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसेपाटील यांना भेटण्यासाठी गेला असल्याची माहिती मिळत आहे मात्र गृहमंत्री यांनी त्यांना उभे पण केले नसल्याची खात्रीलायक माहिती तालुक्याच्या राजधानीतून मिळाली आहे त्यामुळे त्या पोलिसांचे नाव मोठे पण दर्शन खोटे आहे असे खुलेआम बोलले जात आहे.
लुटलेला गुटखा तीन ठिकाणी विकला ?
काष्ठी रोडवर पोलिसांनी चोरलेला गुटखा श्रीगोंदा शहरात तसेच शेजारील तालुक्यातील कुळधरण तसेच कर्जत या ठिकाणी विकला असल्याची माहिती मिळत आहे मात्र खुद्द श्रीगोंदा पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी तपास अर्ध्यावर थांबविला आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
सर्व काही पैश्याने मिटते ?
गुटखा चोरीत मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्यानंतर पोलिसांचे चेहरे पडलेले पाहण्यास मिळाले मात्र म्हणतात ना चोर तो चोर आणि बनतोय शिरजोर या म्हणीचा प्रत्ययानुसार गुटखा चोरीतील पोलीस इतरांना सांगत होता कि अधिकारी व इतर सर्व प्रकरण सर्व काही पैश्याने मिटते त्यामुळे काहीच होत नाही पैशापुढे भूत नाचतात तर हे अधीकारी कोण आहेत असे उर्मट प्रतिक्रिया पोलीस देत असल्याचे माहिती मिळत आहे.
पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई करा – संभाजी ब्रिगेड
गुटखा प्रकरणात आपल्या कर्तव्यात कसूर करणे पकडलेला गुटखा बेकायदेशीरपणे विक्री करणे तसेच प्रकरणाची चर्चा झाल्यावर खोटा आरोपी दाखवून खोटा गुन्हा दाखल करणे,२० लाखाचा माल असताना तो फक्त ३ लाखाचा दाखविणे तसेच खऱ्या आरोपीना मोकाट सोडून देणे असे दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे आहेत हे सर्व गुन्हे पोलीस निरीक्षक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन केले आहेत त्यामुळे पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष टिळक भोस व समित बोरुडे यांनी केली आहे.